सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. सातारा बदद्ल
About Us
माहिती
- सातारा जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स को-ऑप. असोसिएशन लि. सातारा हि महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असून सन १९८२ पासून ४२ वर्षे कार्यरत आहे.
- १८५० स्के. मी. व त्यावरील ५५६.२५ स्के. मी. सुराज्य इमारत संस्थेचा स्व मालकीचा आहे.
- सातारा जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील कर्मचारी व अधिकारी यांचेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. संस्थेकडे प्रोजेक्टर स्क्रीन, साऊंड सिस्टिम, व्हाईट बोर्ड, डीव्हीडी प्लेअर अशा आधुनिक उपकरणांनी सुसज्य, १५० प्रशिक्षणार्थी आसन व्यवस्था असलेला प्रशिक्षण हॉल आहे.
- नागरी सहकारी बँकांतील वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० व नियम १९६१ मधील कलम १०१ नुसार वसुली दाखले देण्याचे कामकाज मा. उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) यांचेमार्फत करण्यात येते त्यामुळे बँकेच्या वसुलीसाठी संस्थेमार्फत कार्य केले जाते.
- नागरी सहकारी बँक कर्मचारी भरतीसाठी मा. सहकार आयुक्त पुणे यांनी केलेल्या एजन्सी म्हणून मान्यता मिळाली आहे
सन २०२३-२०२४ संस्थेने खाली नमूद केलेल्या बँकेतील कर्मचारी
भरतीचे प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
अ.क्र. | बॅंकचे नाव | रिक्त पदे | परीक्षा पद्धत |
---|---|---|---|
१ | कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक लि सातारा | २० | ऑफलाईन |
२ | दी म्युसिनीपल को ऑप बँक लि मुंबई | ८६ | ऑनलाईन |
३ | दी महाराष्ट्र मंत्रालय अँड अलाईड को बँक लि, मुंबई | २७ | ऑनलाईन |
४ | दी कुर्ला नागरी सहकारी बँक लि मुंबई | ३५ क्लार्क व १५ शिपाई | ऑनलाईन |
सदरची भरती प्रक्रिया पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह पद्धतीने
पूर्ण केली आहे.